24 Feb 2014

मनात राहिलेले घर माझे. .गावचे. .

काळ सरकत होता पुढे. .तसे व्यापही वाढले. .
माझ्यातल्या मलाच मी कामाला लावले. .

दिशा बदलल्या तसा भरकटत गेलो. .
अन आजीच्या हातच्या मऊभाताला पोरका मी झालो. .

जायचो गावी तेंव्हा ते घर जवळ घ्यायचे. .
माझे बालपण ते माझ्या ओंजळीत द्यायचे. .

आत्ता त्याच्या जागी नवे घर उभे राहिले. .
पण डोळ्यात त्याच्या ते प्रेम मी कधीच नाही पहिले. 

नव्या घराशीही लवकरच जवळीक होईल. .
                                                                                 पण माझ्या आठवणींना उजाळा ते थोडीच देईल. .


2 comments:

  1. धन्यवाद. .खूप छान वाटले तुम्ही दाद दिलीत त्या बद्दल. . :-)

    ReplyDelete