7 Nov 2015

भिडे काका

       आजचा दिवस खास होता.. चुकून ट्रेन मध्ये  चुकीच्या डब्ब्यात बसलो.. 8.27 ची ट्रेन...चौथा डब्बा..बाजुच्या campartment मधे एक काका बसले होते...सगळे आल्यावर त्यांना good morning म्हणत...ते सुद्धा तेवढ्याच आपुलकीने सर्वांची विचारपूस करत होते...विनू आलास,बस...सावंत साहेब,फराळ आणला का आज...हो रे मल्हार,जागा ठेवली आहे तुझ्या साठी...आवाजातील गोडवा काही औरच...म्हंटलं आज या campartment मध्ये बसू...आणि मी त्या काकांसमोर बसलो...थोड्या वेळासाठी स्तब्ध झालो मी...एवढा वेळ मी ज्या काकांची आपुलकी ऐकत होतो,ते हे सारे जग पाहायला असमर्थ होते...विश्वास नाही बसला माझा माझ्या डोळ्यांवर पण त्या काकांना डोळे नव्हते...

        त्यांचे बोलणे चालू होतेच...एक अनामिक रीत होती बोलण्याची...सर्वांना आपलेसे करणारी...चेहऱ्यावर लहान बाळासारखे हास्य...मध्ये मध्ये joke मारून ते सर्वांना हसवत होते...आणि स्वतः सुद्धा दिलखुलास हसत होते...कुणाचाही चेहरा कधीच ना पाहिलेला हा माणूस सावंतांना म्हणतो...सावंत साहेब,हल्ली तूम्ही नाराज दिसता हो...बरे आहे ना सगळे...आणि मग सावंत साहेब सुद्धा त्यांच्याकडे मन मोकळे करतात....नाराज दिसता...कशी काय माणसे दिसत असतील त्यांना....माझे station आले...मी उतरून गेलो...पण प्रवासात भेटलेले भिडे काका माझ्या कानात साठवले गेले होते...आत्ता बहुतेक माझा डब्बा रोज चुकत जाईल.... :)