2 Dec 2016

LIFE IS FRAGILE , APPRECIATE IT. .

              सगळे मला विचारतात. . तू लोकांना काहीच का बोलत नाही. . जसे आहे तसे accept का करतोस. . कधी चिडत का नाहीस. . परवा जर ते लोक माझ्यासोबत असते तर कळाले असते. . लोकांवर राग तो काय ठेवायचा. .
               तीन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या माझ्या मावशीचे मिस्टर अचानक. . घरी एकटे असताना वारले. . वय अगदी कमी. . एक वर्षाचा मुलगा. . ना कधी कुठली व्यसने ना कुणाशी काही भांडण. . अगदी साधा माणूस. . आयुष्य असेच असते. . अगदी क्षणभंगुर. . हे असे दुसऱ्यांदा होतेय. . अश्या छोट्याश्या आयुष्यात आपण उद्या असू कि नाही याची शाश्वती नाही. . तर काय कुणावर राग ठेवायचा. . आणि का एखाद्याला बदलायला आपली शक्ती वापरायची. . त्या पेक्षा आहे तसे या जगाला स्वीकारायचे. . आपल्या परीने जेवढे होईल तेवढे प्रेम वाटायचे. . तसे दीर्घायुष्य सगळ्यांना मिळावेच. . पण आपली वेळ अली कि निघून जायचे. . गुपचूप . .
                Negative आहे बोलणे माझे पण अत्ता आहे तसे मी मला सुद्धा स्वीकारलंय. .

MAY YOU HAVE LONG & SAFE LIFE

5 Jul 2016

किनाऱ्यावरील स्टारफिश. .

     एकदा एक समजूतदार माणूस समुद्राच्या किनार्यावरून चालत असतो. .तो पाहतो कि एक लहान मुलगा तिथले काही तरी उचलून हळुवारपणे समुद्रात सोडून येत असतो. .
     जवळ जाऊन तो मुलाला विचारतो. ." बाळा, काय करतो आहेस ? "
     मुलगा म्हणतो. ."मी स्टारफिश उचलून समुद्रात सोडतो आहे. .जोराच्या लाटा येताना हे स्टारफिश सोबत घेऊन येताहेत. .पण ते तसेच किनाऱ्यावर मागे सोडले जाताहेत. .जर मी यांना परत सोडले नाही तर हे मरतील. ."
     तो माणूस स्वतःशीच हसतो आणि म्हणतो. . "समोर बघ, अथांग पसरलेला समुद्र किनारा आहे. .त्यावर हजारो असे मासे पडलेले आहेत. .तू काय मोठा फरक पडणार आहेस हे असले काम करून ?"
     सगळे नम्रपणे ऐकून घेतल्यावर मुलगा खाली वाकतो. .अजून एक मासा उचलतो. .त्याला पाण्यात सोडतो. .आणि समाधानाने हसून म्हणतो. ."त्या एका माश्याला तरी माझ्या वागण्याने नक्कीच फरक पडलाच असेल ना. .!!!"

30 Jun 2016

आंबट संत्री


        तो दर वेळी संत्री घ्यायचा, त्या वयस्कर बाई कडून. . वजन करून पैसे दिले की एक संत्री काढून. . सोलून. . एक फोड खायचा. . मग चिडून ते संत्रे तिच्या हातात द्यायचा. . " काय ही आंबट संत्री " . . ती खायची एक फोड आणि म्हणायची. . " गोडच तर आहे " . .तोवर हा तिथून निघून गेलेला असायचा. .
       त्याची बायको त्याला म्हणायची. . " संत्री तर गोड आहेत, तुझी रोजची नाटके कशा साठी चालू आहेत "
        तो हसून म्हणायचं. . " ती आज्जी संत्री विकते पण कधीच खात नाही, एक तरी खाऊ दे ना तिला "
        त्या आज्जीच्या समोर बसणारा भाजीवाला तिला म्हणायचा. . " तो माणूस रोज तुझ्याशी भांडतो, तरी पण गुपचूप वजनापेक्षा दोन संत्री जास्तच का ग टाकतेस  "       
       ती हसून म्हणते. . " तो मला संत्री खाऊ घालायला हे रोज करतो. . फक्त त्यालाच वाटते की मला हे कळत नाही. . मी वजनात जास्ती कधीच टाकत नाही. . त्याच्या प्रेमाने वजनकाटा झुकतो ".