7 Nov 2015

भिडे काका

       आजचा दिवस खास होता.. चुकून ट्रेन मध्ये  चुकीच्या डब्ब्यात बसलो.. 8.27 ची ट्रेन...चौथा डब्बा..बाजुच्या campartment मधे एक काका बसले होते...सगळे आल्यावर त्यांना good morning म्हणत...ते सुद्धा तेवढ्याच आपुलकीने सर्वांची विचारपूस करत होते...विनू आलास,बस...सावंत साहेब,फराळ आणला का आज...हो रे मल्हार,जागा ठेवली आहे तुझ्या साठी...आवाजातील गोडवा काही औरच...म्हंटलं आज या campartment मध्ये बसू...आणि मी त्या काकांसमोर बसलो...थोड्या वेळासाठी स्तब्ध झालो मी...एवढा वेळ मी ज्या काकांची आपुलकी ऐकत होतो,ते हे सारे जग पाहायला असमर्थ होते...विश्वास नाही बसला माझा माझ्या डोळ्यांवर पण त्या काकांना डोळे नव्हते...

        त्यांचे बोलणे चालू होतेच...एक अनामिक रीत होती बोलण्याची...सर्वांना आपलेसे करणारी...चेहऱ्यावर लहान बाळासारखे हास्य...मध्ये मध्ये joke मारून ते सर्वांना हसवत होते...आणि स्वतः सुद्धा दिलखुलास हसत होते...कुणाचाही चेहरा कधीच ना पाहिलेला हा माणूस सावंतांना म्हणतो...सावंत साहेब,हल्ली तूम्ही नाराज दिसता हो...बरे आहे ना सगळे...आणि मग सावंत साहेब सुद्धा त्यांच्याकडे मन मोकळे करतात....नाराज दिसता...कशी काय माणसे दिसत असतील त्यांना....माझे station आले...मी उतरून गेलो...पण प्रवासात भेटलेले भिडे काका माझ्या कानात साठवले गेले होते...आत्ता बहुतेक माझा डब्बा रोज चुकत जाईल.... :)

21 Oct 2015

पुजा


ठाणे स्टेशनच्या तीसरया प्लॅटफॅार्मवर उतरत होतो. समोरुन दिवसभर काम करुन दमलेली आई व तिची लेक त्यांचे उरलेले सामान चाकाच्या गाडिवरुन ओढुन वर आणत होत्या.त्या अगदिच माझ्या समोर आल्या. झटकन मी बाजुला झालो. वाटेत येउन मला त्यांचे कष्ट वाढवायचे नव्हते.त्यांचे बोलणे माझ्या कानावर पडले. ते लेकरु माउलीला म्हणाले " काश हमारी भी न्नौ दिन पुजा होती "
परिस्थितीशी झगडताना कुणाही पुढे हात न पसरण्याची शिकवण माउली तिला देत होतीच, पण कोवळे मनच ना ते. .मी विचारात पडलो. .ती आई काय म्हंटली असणार. .

24 Feb 2015

आज थोडे एकटे एकटे वाटले

काही नाती जन्माने बांधलेली असतात तर काही मानलेली . .पण आयुष्यात काही अशीही नाती बनतात जी नसतात बांधलेली किंवा मानलेली. .ती असतात जाणलेली. . अशीच आहे माझी गुड्डू. . म्हणते जाड्या. .we are god's child. .brother and sister not by blood but by bond. .

आज थोडे एकटे एकटे वाटले. .
बाकी काही नाही,तुझी आठवण आली म्हणून थोडे बोलावेसे वाटले. .

आधी सगळ्या मित्रांवर माझा सारखाच जीव असायचा. .
tiger त्यांची साठी हक्काचा आधार वाटायचा. .
आज, स्वतःलाच मला जरा धडापडल्या सारखे वाटले. .
बाकी काही नाही,तुझी आठवण आली म्हणून थोडे बोलावेसे वाटले. .

सगळ्यांवर नको प्रेम करूस, तुझे म्हणणे असायचे. .
कुणी असावे special ज्याला आपले सगळे माहित असावे, मला सुधा वाटायचे. .
नकळत मी बदलत गेलो सगळ्यांना कळून चुकले. .
बाकी काही नाही,तुझी आठवण आली म्हणून थोडे बोलावेसे वाटले. .

तुझ्याशी बोलताना ती कमी नाही जाणवायची. .
निखळ मैत्री आड काही आठवणींची लपाछुपी चालायची. .
तू बदलल्यावर थोडे कठीणच गेले. .
बाकी काही नाही,तुझी आठवण आली म्हणून थोडे बोलावेसे वाटले. .

आज ती नाती पुन्हा माझ्याकडे वळून येत आहेत. .
त्यांचे खेळ. .त्यांचे नियम. .मला खेळायला लावत आहेत. .
गर्दीत राहून सुधा आज थोडे एकटे एकटे वाटले. .
बाकी काही नाही,तुझी आठवण आली म्हणून थोडे बोलावेसे वाटले. .