आयुष्य पुढे सरकत असताना बरेच नवनवीन शिकत गेलो. .धडपडत का होईना. .पुढेच जात गेलो. . या प्रवासात अनुभवलेल्या माझ्या छोटुश्या आभाळाचा हा त्याहून छोटुसा कवडसा. .
28 Feb 2014
27 Feb 2014
भीमाशंकर भ्रमंती
समोर पसरलेले अथांग मैदान. .त्यात दूर दूर पसरलेल्या शेकोट्या. .आभाळातल्या चांदण्यांची सावलीच खाली पडली आहे असे भासवत होत्या. .
या डोंगर चढण्याच्या प्रपंचात थंडी कुठल्याकुठे पळून गेली होती. .पण गार पाण्याच्या कुंडात पाय ठेवले आणि थंडीने पुन्हा जवळ घेतले. .मागून मित्रांनी धक्का दिला आणि मी त्या बर्फाळलेल्या कुंडाच्या स्वाधीन झालो. .नंतर या सर्वांनीही उड्या घेतल्याच. .महादेवाला नमन करण्या आधीची हि प्रथाच आमची. .
दोन तास रांगेत शिस्तपालन केल्यानंतर महादेवाचे दर्शन झाले आणि मन तृप्त झाले. .
आत्ता मी पसरलो आहे. .त्याच निद्रिस्थ मैदानात. .शेकोट्या सुधा बहुदा झोपल्या आता. .माझा सगळ्यात आवडता खेळ पाहतोय. .टिपूर चांदण्यांचा. .पडत्या चांदण्या वेचत . .
या सौंदर्यास बंधिस्त करेल असा मोबाईल नाही माझ्या जवळ. .पण तशाच सुंदर पहाटेचे हे चित्र. .
Labels:
क्षण कॅमेरयात टिपलेले,
माझी भटकंती
Location:
Bhimashankar, Maharashtra, India
25 Feb 2014
24 Feb 2014
मनात राहिलेले घर माझे. .गावचे. .
काळ सरकत होता पुढे. .तसे व्यापही वाढले. .
माझ्यातल्या मलाच मी कामाला लावले. .
दिशा बदलल्या तसा भरकटत गेलो. .
अन आजीच्या हातच्या मऊभाताला पोरका मी झालो. .
जायचो गावी तेंव्हा ते घर जवळ घ्यायचे. .
माझे बालपण ते माझ्या ओंजळीत द्यायचे. .
आत्ता त्याच्या जागी नवे घर उभे राहिले. .
पण डोळ्यात त्याच्या ते प्रेम मी कधीच नाही पहिले.
नव्या घराशीही लवकरच जवळीक होईल. .
पण माझ्या आठवणींना उजाळा ते थोडीच देईल. .
Subscribe to:
Posts (Atom)