"life is so beautiful,like this painting"
माणसांचे व्यक्त होणे कित्ती छान असते. . मनातल्या भावना कागदावर सहज उमटत नाहीत. . पण त्या जेंव्हा शब्दांचा आधार घेऊन चोर पावलांनी कागदावर झिम्मा खेळतात. . तेंव्हा फार सुंदर दिसतात. . अगदी नितळ. . वाहते पाणीच जणू. . अशीच माझी एक मैत्रीण आहे. . छान छान बोलणारी. . कामावरून फार क्वचित सुटी घेणारी. . आजारी पडून शेवटी सुटी घेते. . म्हणालो तिला या 'me time' मध्ये म्हणजे फक्त आपल्या स्वतःच्या 'हक्काच्या वेळेमध्ये' काहीतरी लिह किंवा चित्र काढ. . वेडीने दोन्ही गोष्टी केल्या. . हे तिचेच शब्द. . जसेच्या तसे. .
आयुष्यात एखादी गोष्ट स्वीकारणे आणि पचवणं फार कठीण जातं. आपलं मन सतत खात राहतं. जॉबला जाताना अन येताना मन खाली असतं अन ते खाली मन न पचणाऱ्या गोष्टी किंवा न स्वीकारता येणाऱ्या गोष्टींची उत्तरं शोधत राहतं. बदल हा जीवनाचा नियम आहे आणि तो हसत हसत स्वीकारला पाहिजे. आपण आनंदानं राहिलो तर आजूबाजूचे पण आनंदानं राहतात आणि आपलं शरीर पण तसंच प्रतिसाद देतं. शरीरानं थकलेलं आणि मनानं थकणं यात खूप फरक असतो. आयुष्य कुठे भरकटत नेईल याचा पत्ता सुद्धा लागून देत नाही जीवन. आज मुलाखत पहिली संपदा कुलकर्णी हिची. त्यांचं happy farm हे video पाहीलं छान हो sorry farm of happiness आणि त्याचं स्वप्न कळालं.
मी किती स्वप्नं पहिली होती लहानपणी अन आता असं वाटतंय काहीच होताना नाही. वयात आल्यावर शरिरावर जसे परिणाम होतात आणि मनावर पण होतात अन हे किती जबरदस्त असतात ते कळायला लागतात. मग या चढाओढीत आपल्या आवडी निवडी मागे पडतात हे काळातच नाही.
आपले छंद आपलं जीवन हलकं फुलकं करतात आणि ते गरजेचं असतं ते आपल्या जीवनाला योग्य दिशा देण्यास मदत करतात.
त्या दिवशी घरी येताना express च्या दारात बसले एक मुलीशेजारी, ती फोनवर english मध्ये बोलून गेली "life is going fuckingly fast yaar ... " i was literally laughing, not words but the real meaning खरंच माझ्या आयुष्याची २३ वर्ष कशी निघून गेली कळलेच नाही अन हे वर्षतर , त्यामुळे काय आयुष्यातून वेचावे आणि काय सोडून द्यावे ह्याचा विचार करावा लागतो. अन कधी कधी तेवढा वेळ नियती देत नाही. . कधी कधी. . . मला एवढंच माहितीये i want peace ! in my life. . :)
हा लेख टाकतोय आठवण करून द्यायला. . की स्वतःसाठी असा 'me time' थोडा वेळ तरी काढत राहा. . लिहीत रहा. .रेखाटत रहा. .गात रहा. .नाचत रहा. .फिरत रहा. .हसत रहा. .पावसात भिजत रहा. . LIFE IS FUCKING FAST. . म्हणूनच मध्येच असे pause घेत रहा. . शेवटी जायचे आहेच हो कधी तरी. . पण जाण्या आधी आयुष्य भरभरून जगत रहा. .
No comments:
Post a Comment