2 Dec 2016

LIFE IS FRAGILE , APPRECIATE IT. .

              सगळे मला विचारतात. . तू लोकांना काहीच का बोलत नाही. . जसे आहे तसे accept का करतोस. . कधी चिडत का नाहीस. . परवा जर ते लोक माझ्यासोबत असते तर कळाले असते. . लोकांवर राग तो काय ठेवायचा. .
               तीन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या माझ्या मावशीचे मिस्टर अचानक. . घरी एकटे असताना वारले. . वय अगदी कमी. . एक वर्षाचा मुलगा. . ना कधी कुठली व्यसने ना कुणाशी काही भांडण. . अगदी साधा माणूस. . आयुष्य असेच असते. . अगदी क्षणभंगुर. . हे असे दुसऱ्यांदा होतेय. . अश्या छोट्याश्या आयुष्यात आपण उद्या असू कि नाही याची शाश्वती नाही. . तर काय कुणावर राग ठेवायचा. . आणि का एखाद्याला बदलायला आपली शक्ती वापरायची. . त्या पेक्षा आहे तसे या जगाला स्वीकारायचे. . आपल्या परीने जेवढे होईल तेवढे प्रेम वाटायचे. . तसे दीर्घायुष्य सगळ्यांना मिळावेच. . पण आपली वेळ अली कि निघून जायचे. . गुपचूप . .
                Negative आहे बोलणे माझे पण अत्ता आहे तसे मी मला सुद्धा स्वीकारलंय. .

MAY YOU HAVE LONG & SAFE LIFE

5 Jul 2016

किनाऱ्यावरील स्टारफिश. .

     एकदा एक समजूतदार माणूस समुद्राच्या किनार्यावरून चालत असतो. .तो पाहतो कि एक लहान मुलगा तिथले काही तरी उचलून हळुवारपणे समुद्रात सोडून येत असतो. .
     जवळ जाऊन तो मुलाला विचारतो. ." बाळा, काय करतो आहेस ? "
     मुलगा म्हणतो. ."मी स्टारफिश उचलून समुद्रात सोडतो आहे. .जोराच्या लाटा येताना हे स्टारफिश सोबत घेऊन येताहेत. .पण ते तसेच किनाऱ्यावर मागे सोडले जाताहेत. .जर मी यांना परत सोडले नाही तर हे मरतील. ."
     तो माणूस स्वतःशीच हसतो आणि म्हणतो. . "समोर बघ, अथांग पसरलेला समुद्र किनारा आहे. .त्यावर हजारो असे मासे पडलेले आहेत. .तू काय मोठा फरक पडणार आहेस हे असले काम करून ?"
     सगळे नम्रपणे ऐकून घेतल्यावर मुलगा खाली वाकतो. .अजून एक मासा उचलतो. .त्याला पाण्यात सोडतो. .आणि समाधानाने हसून म्हणतो. ."त्या एका माश्याला तरी माझ्या वागण्याने नक्कीच फरक पडलाच असेल ना. .!!!"

30 Jun 2016

आंबट संत्री


        तो दर वेळी संत्री घ्यायचा, त्या वयस्कर बाई कडून. . वजन करून पैसे दिले की एक संत्री काढून. . सोलून. . एक फोड खायचा. . मग चिडून ते संत्रे तिच्या हातात द्यायचा. . " काय ही आंबट संत्री " . . ती खायची एक फोड आणि म्हणायची. . " गोडच तर आहे " . .तोवर हा तिथून निघून गेलेला असायचा. .
       त्याची बायको त्याला म्हणायची. . " संत्री तर गोड आहेत, तुझी रोजची नाटके कशा साठी चालू आहेत "
        तो हसून म्हणायचं. . " ती आज्जी संत्री विकते पण कधीच खात नाही, एक तरी खाऊ दे ना तिला "
        त्या आज्जीच्या समोर बसणारा भाजीवाला तिला म्हणायचा. . " तो माणूस रोज तुझ्याशी भांडतो, तरी पण गुपचूप वजनापेक्षा दोन संत्री जास्तच का ग टाकतेस  "       
       ती हसून म्हणते. . " तो मला संत्री खाऊ घालायला हे रोज करतो. . फक्त त्यालाच वाटते की मला हे कळत नाही. . मी वजनात जास्ती कधीच टाकत नाही. . त्याच्या प्रेमाने वजनकाटा झुकतो ". 

26 Jun 2016

आयुष्य. .तिला कळालेले. .

"life is so beautiful,like this painting"


      माणसांचे व्यक्त होणे कित्ती छान असते. . मनातल्या भावना कागदावर सहज उमटत नाहीत. . पण त्या जेंव्हा शब्दांचा आधार घेऊन चोर पावलांनी कागदावर झिम्मा खेळतात. . तेंव्हा फार सुंदर दिसतात. . अगदी नितळ. . वाहते पाणीच जणू. . अशीच माझी एक मैत्रीण आहे. . छान छान बोलणारी. . कामावरून फार क्वचित सुटी घेणारी. . आजारी पडून शेवटी सुटी घेते. . म्हणालो तिला या 'me time' मध्ये म्हणजे फक्त आपल्या स्वतःच्या 'हक्काच्या वेळेमध्ये' काहीतरी लिह किंवा चित्र काढ. .  वेडीने दोन्ही गोष्टी केल्या. . हे तिचेच शब्द. . जसेच्या तसे. .
      आयुष्यात एखादी गोष्ट स्वीकारणे आणि पचवणं फार कठीण जातं. आपलं मन सतत खात राहतं. जॉबला जाताना अन येताना मन खाली असतं अन ते खाली मन न पचणाऱ्या गोष्टी किंवा न स्वीकारता येणाऱ्या गोष्टींची उत्तरं शोधत राहतं. बदल हा जीवनाचा नियम आहे आणि तो हसत हसत स्वीकारला पाहिजे. आपण आनंदानं राहिलो तर आजूबाजूचे पण आनंदानं राहतात आणि आपलं शरीर पण तसंच प्रतिसाद देतं. शरीरानं थकलेलं आणि मनानं थकणं यात खूप फरक असतो. आयुष्य कुठे भरकटत नेईल याचा पत्ता सुद्धा लागून देत नाही जीवन. आज मुलाखत पहिली संपदा कुलकर्णी हिची. त्यांचं happy farm हे video पाहीलं छान हो sorry farm of happiness आणि त्याचं स्वप्न कळालं.
      मी किती स्वप्नं पहिली होती लहानपणी अन आता असं वाटतंय काहीच होताना नाही. वयात आल्यावर शरिरावर जसे परिणाम होतात आणि मनावर पण होतात अन हे किती जबरदस्त असतात ते कळायला लागतात. मग या चढाओढीत आपल्या आवडी निवडी मागे पडतात हे काळातच नाही.
आपले छंद आपलं जीवन हलकं फुलकं करतात आणि ते गरजेचं असतं ते आपल्या जीवनाला योग्य दिशा देण्यास मदत करतात.
      त्या दिवशी घरी येताना express च्या दारात बसले एक मुलीशेजारी, ती फोनवर english  मध्ये बोलून गेली "life is going fuckingly fast  yaar ... " i was literally laughing, not  words but the real meaning  खरंच माझ्या आयुष्याची २३ वर्ष कशी निघून गेली कळलेच नाही अन हे वर्षतर , त्यामुळे काय आयुष्यातून वेचावे आणि काय सोडून द्यावे ह्याचा विचार करावा लागतो. अन कधी कधी तेवढा वेळ नियती देत नाही. . कधी कधी. . . मला एवढंच माहितीये i want peace ! in my life. . :)

      हा लेख टाकतोय आठवण करून द्यायला. . की स्वतःसाठी असा 'me time' थोडा वेळ तरी काढत राहा. . लिहीत रहा. .रेखाटत रहा. .गात रहा. .नाचत रहा. .फिरत रहा. .हसत रहा. .पावसात भिजत रहा. . LIFE IS FUCKING FAST. . म्हणूनच मध्येच असे pause घेत रहा. . शेवटी जायचे आहेच हो कधी तरी. . पण जाण्या आधी आयुष्य भरभरून जगत रहा. .