16 Dec 2014

राहुल भाय. .

      तीन वर्ष झाली आज त्या दिवसाला. .अजून सुधा कधी कधी मी वेड्या सारखा तुझ्या number वर कॉल करून बघत असतो राहुल. .swich off शिवाय दुसरे काही ऐकू येईल या आशेने. .आठवतोय एक एक क्षण. .कीर्तीचा कॉल आला. .संकेत दादा, भाई कॉल उचलत नाहीये. .मी दर वेळी सारखा म्हणालो. .आलोच घरी घेऊन त्याला, तू जेवण वाढून ठेव. .कसे माहित मला यार. .माझा कॉलच last कॉल असेल तुझा फोन off होण्याआधीचा. .म्हणालो होतो ना तुला. .काळोख झालाय. .गाडी हळू चालव. .कित्ती तरी दिवस याच विचारात काढलेत यार. .कि मी तुला गाडी का शिकवली. .दर वेळी मला घेऊन जाणारा त्या दिवशी एकटाच गेलास. .का मी आलो नाही त्या दिवशी तुझ्या सोबत. .आज घरी जेवायला गेलेलो आपल्या. .काकू जेवण वाढताना त्यांच्या भाई ला माझ्यात शोधात होत्या. .कीर्ती ने त्या दिवशी पण आपली दोन ताटे वाढली होती रे. .तू फसवून गेलास मला राहुल्या. .फसवून गेलास. . .




सगळ्यात आधी सगळ्यांचे वाढदिवस तुलाच लक्षात असायचे..
केक आणायला पण पैसे आधी तुझ्याच खिशातले निघायचे..


तूझ्या तुटलेल्या बोटाची मस्करी करणे पण तुला जमायचे..
तू शिकवत असलास न राहुल्या कि सगळे पटकन समजायचे..



तु गेल्यावर कधी वाढदिवसच केला नाहीये..

आपली पार्टी पण साल्या अजून पेंडिंग राहिलीये..

तुला रेखाटताना हात थरथरत आहेत...
डोळे सारखे सारखे भरून येत आहेत...

काय बोलू happy birthday..आठवण येतेय यार राहुल तुझी खूप...

7 Sept 2014

छोट्या छोट्या गोष्टी

एखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला. .दुकानातल्या गर्दीतला. .
साधाच असूनसुद्धा मनाला भावलेला. .
वेगळेच काही घेऊन बाहेर पडतो आपण. .विचार करत. .
' तो ड्रेस घ्यायला हवा होता यार. . . '

ट्रेन मध्ये असताना एखादी चिमुरडी येते. .गोड हसते. .
पण भिक मागतेय कळल्यावर आपले तिकडे दुर्लक्षच असते. .
२ ३ रुपये देऊ म्हणत आपण सुटे शोधत बसतो. .
देऊ कि नको या आपल्या धाव्यात ती निघून जाते. .पुढे गेल्यावर मन म्हणते. .
' सुटे समोर होते , द्यायला हवे होते यार . . . '

जेवणाच्या सुटीत एखादा मित्र जवळ येतो. .फार विश्वासाने घरचे प्रॉब्लेम सांगतो. .
आपले चांगले आहे याच्यापेक्षा म्हणत आपण सुखावतो. .
'काही मदत हवी आहे का?' म्हणायचे असून आपण गप्प राहतो. .
सुटी संपते, मदत नाही निदान सहानभूतीचा हात तरी खांद्यावर ठेवायला हवा होता. . आपण म्हणतच राहतो. .

असेच होते नेहमी. . छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात. .
खरे तर या छोट्या गोष्टीच जगण्याचे कारण असतात. .

जगण्याची साधने शोधताना जगणेच राहत नाहीये ना. . .
आनंद झाला तर हस निखळ. . वाईट वाटले तर डोळ्यांना बांध घालू नको. .

आवडलेल्या गाण्यावर मन नाही डूलले तर LIKE कसले. .
आपल्यांच्या दुखात डोळे नाही भरले तर LIFE कसले . .
मित्रांच्या फालतू जोक वर पोट दुखे पर्यंत नाही हसलो तर हसणे कसले. .
आनंदात आनंद. .दु:खात दु:ख नाही जाणवले. . तर जगणे कसले. . 

26 Jun 2014

फुलांचे जगणे. .

जगणे कुणी फुलांकडून शिकावे. . 
एक दिसाचे आयुष्य तरी मन मोकळे हसावे. . 

10 May 2014

आई. .happy mothers day. .

देवाला सगळ्यांची काळजी घेता येत नाही. .
म्हणून त्याने तुला बनवले का ग आई. .

मला पाहण्या आधिपासूनच माझ्यावर प्रेम करायला. . 
माझ्या प्रत्येक चुकांवर पांघरूण घालायला. . 
कधि रागवायला,कधि रुसुन बसायला. . 
पण सगळ्यात आधि जवळ घ्यायला त्याने पाठवले का ग तुला . . 

पण देवही कधि तरी रडत असेलच ग आई. . 
त्याला तुझी आठवण येणार कशी नाही. . 

तसे सर्व दिवस तुझेच असतात. .तरी सुद्धा. .happy mothers day aai. .love you. .

4 Mar 2014

बोलके डोळे



आसवांनो, माझिया डोळ्यांतुनी वाहू नका !
अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका !

घाव हे माझे गुलाबी मोहराया लागले !
कोण मी आहे मला आतातरी सांगू नका !

हासते आयुष्य माझे पाहुनी माझी दशा ;
का तुम्हीही हसता ? हासू नका ! हासू नका !

स्वप्न माझे भंगले अन गीत माझे संपले ;
हाय, बाजारात माझा हुंदका अनु नका !

        -सुरेश भट.


इतके दिवस माझ्या चित्रांवरून मग कविता सुचायच्या. .पण आज कवितेवरून चित्र तयार झाले. .

28 Feb 2014

madhuri dixit

.
ओठ जेव्हा अबोल तेव्हा तुझे डोळे बोलके होतात. . 
लपवण्याच्या प्रयत्नांत मला सर्व सांगुन जातात. .


27 Feb 2014

भीमाशंकर भ्रमंती

रात्रीचे दोन वाजून गेलेत,आणि आम्हा  मित्रांची भटकंतीची ओढ आम्हाला भीमाशंकरला घेऊन आली आहे. तीन डोंगर चढून येत असताना पाय अक्षरशः तुटून गेले होते पण डोंगर माथ्यावर पोहोचल्यावर जणू जग जिंकल्यासारखेच वाटतेय. .

समोर पसरलेले अथांग मैदान. .त्यात दूर दूर पसरलेल्या शेकोट्या. .आभाळातल्या चांदण्यांची सावलीच खाली पडली आहे असे भासवत होत्या. .
या डोंगर चढण्याच्या प्रपंचात थंडी कुठल्याकुठे पळून गेली होती. .पण गार पाण्याच्या कुंडात पाय ठेवले आणि थंडीने पुन्हा जवळ घेतले. .मागून मित्रांनी धक्का दिला आणि मी त्या बर्फाळलेल्या कुंडाच्या स्वाधीन झालो. .नंतर या सर्वांनीही उड्या घेतल्याच. .महादेवाला नमन करण्या आधीची हि प्रथाच आमची. .
दोन तास रांगेत शिस्तपालन केल्यानंतर महादेवाचे दर्शन झाले आणि मन तृप्त झाले. .
आत्ता मी पसरलो आहे. .त्याच निद्रिस्थ मैदानात. .शेकोट्या सुधा बहुदा झोपल्या आता. .माझा सगळ्यात आवडता खेळ पाहतोय. .टिपूर चांदण्यांचा. .पडत्या चांदण्या वेचत . .
या सौंदर्यास बंधिस्त करेल असा मोबाईल नाही माझ्या जवळ. .पण तशाच सुंदर पहाटेचे हे चित्र. .

25 Feb 2014

अनोळखी फुल. .


त्यालाही कदाचित कळत नसावे किती सुंदर आहे ते . .

24 Feb 2014

मनात राहिलेले घर माझे. .गावचे. .

काळ सरकत होता पुढे. .तसे व्यापही वाढले. .
माझ्यातल्या मलाच मी कामाला लावले. .

दिशा बदलल्या तसा भरकटत गेलो. .
अन आजीच्या हातच्या मऊभाताला पोरका मी झालो. .

जायचो गावी तेंव्हा ते घर जवळ घ्यायचे. .
माझे बालपण ते माझ्या ओंजळीत द्यायचे. .

आत्ता त्याच्या जागी नवे घर उभे राहिले. .
पण डोळ्यात त्याच्या ते प्रेम मी कधीच नाही पहिले. 

नव्या घराशीही लवकरच जवळीक होईल. .
                                                                                 पण माझ्या आठवणींना उजाळा ते थोडीच देईल. .