तो दर वेळी संत्री घ्यायचा, त्या वयस्कर बाई कडून. . वजन करून पैसे दिले की एक संत्री काढून. . सोलून. . एक फोड खायचा. . मग चिडून ते संत्रे तिच्या हातात द्यायचा. . " काय ही आंबट संत्री " . . ती खायची एक फोड आणि म्हणायची. . " गोडच तर आहे " . .तोवर हा तिथून निघून गेलेला असायचा. .
त्याची बायको त्याला म्हणायची. . " संत्री तर गोड आहेत, तुझी रोजची नाटके कशा साठी चालू आहेत "
त्याची बायको त्याला म्हणायची. . " संत्री तर गोड आहेत, तुझी रोजची नाटके कशा साठी चालू आहेत "
तो हसून म्हणायचं. . " ती आज्जी संत्री विकते पण कधीच खात नाही, एक तरी खाऊ दे ना तिला "
त्या आज्जीच्या समोर बसणारा भाजीवाला तिला म्हणायचा. . " तो माणूस रोज तुझ्याशी भांडतो, तरी पण गुपचूप वजनापेक्षा दोन संत्री जास्तच का ग टाकतेस "
ती हसून म्हणते. . " तो मला संत्री खाऊ घालायला हे रोज करतो. . फक्त त्यालाच वाटते की मला हे कळत नाही. . मी वजनात जास्ती कधीच टाकत नाही. . त्याच्या प्रेमाने वजनकाटा झुकतो ".
No comments:
Post a Comment