19 Jan 2018

ती आहे. .

         काही दिवस असे असतात जेंव्हा तुमच्या भावनांबद्दल तुम्हाला काहीच लिहता येत नाही. . ओळखीच्या शब्दांत . . भावना हातामध्ये असलेल्या पेन पेक्षा जड होतात. .इतक्या कि नाही पेलवत. .
         मग तुम्ही सर्व सैल सोडता. . त्या क्षणांना सर्व बहाल करता . . वेळ मग हातात घेतो सर्व काही . . हे सारे तुम्ही तिच्या डोळ्यांत पाहत असता. .
        तुम्हाला इतकेच माहित असते कि जग प्रतिबिंबांमध्ये अधिक सुंदर असते. . कुणाच्या जवळ असलेल्या श्वासांमध्ये. . तुम्हाला कळून चुकते कि आजूबाजूचे सारे काही सजीव झाले आहे आणि वेळेच्या एका कड्यावर उभे राहून. . तुम्ही स्वतःला भेटता. . तुम्ही स्वतःला घातलेल्या बंधनांच्या पलीकडे. .
         आणि ही सारी बंधने तोडून तुम्ही जसे जाता विचारांच्या आणि शब्दांच्या पलीकडे . .आभाळ मोकळे होऊ लागते . . अन अनेक रंग मग विरघळू लागतात . .आपला परिचित परिसर सोडून तुम्ही खूप खूप दूर जाता. .
         आणि मग इथे मी तिची वाट पाहतोय. . स्वीकारतोय तिला. .तिच्या सर्व काळोखासह . . अन सर्व प्रकाशासह. . तिच्या चांगल्या वाईट स्वनांसह . . तिला कसलीच निवड करायची गरज नाहीये . . तिला कळालेय . . ती संपूर्ण आहे. .
          तिचे अस्तित्व दाखवायची गरज नाहीये तिला . . ती आहे एक अस्तित्व . . प्रत्येक श्वासामध्ये . . आणि त्या श्वासांमधील अंतरामध्ये. .
          ती आहे . . 

No comments:

Post a Comment